Monday, March 24, 2025
Homeगुन्हाकर्ज वसुलीसाठी दुचाकीने जाणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण !

कर्ज वसुलीसाठी दुचाकीने जाणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण !

कर्ज वसुलीसाठी दुचाकीने जाणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण !

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कर्ज वसुलीसाठी दुचाकीने जाणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशयित दुचाकीस्वारांनी अडवले. त्याच्याकडून २५ हजाराची रक्कम, दुचाकी व मोबाइल हिसकावून घेत मारहाण केली.

दरम्यान, ही घटना जामनेर- पहूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास नेरी येथील पेट्रोल पंपाजवळ घडली. फिर्यादी अमोल शेकन्ना मेकला (२६, रा. शिव कॉलनी, जळगाव) हे देवपिंप्री व पहूर येथे कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसूल करण्यासाठी व कर्जाची रक्कम वाटपासाठी जळगाव येथून सकाळी ६ वाजता निघाले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास नेरी येथून पुढे जात असताना पेट्रोल पंपाजवळ समोरून दुचाकीवर तोंडाला कापड बांधून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.
त्यातील एकाने मेकला यांचे हात पकडले व दुस-याने त्यांच्या खिशातील २५ हजार व मोबाईल काढून घेतला. दोघांपैकी एकाने मेकला यांच्या दुचाकीवर बसून पळ काढला व दुसरा त्याने आणलेल्या दुचाकीवरून पळून गेला.

घाबरलेल्या अवस्थेतील अमोल मेकला यांनी चालत देवपिंप्री गाठले व फायनान्स कंपनीच्या वरिष्ठांना माहिती दिली. मेकला यांच्याकडील २५ हजार रोख, ३० हजारांची दुचाकी व ५ हजाराचा मोबाईल असा ६० हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी अनोळखी दोन इसमांविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या