Wednesday, March 26, 2025
Homeजळगावकला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रा.प्रबोधनी अंतर्गत फॉरेन्सिक सायन्स विषयावर मार्गदर्शन.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रा.प्रबोधनी अंतर्गत फॉरेन्सिक सायन्स विषयावर मार्गदर्शन.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रा.प्रबोधनी अंतर्गत फॉरेन्सिक सायन्स विषयावर मार्गदर्शन.

यावल दि.५   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रमाअंतर्गत “फॉरेन्सिक सायन्स” विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले..
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा.
अश्विनी कोल्हे यांनी फॉरेन्सिक सायन्स विषयावर बोलताना डीएनएचे विश्लेषण, फिंगरप्रिंट्स, ब्लडस्टेन पॅटर्न, फायर ड्रेबीज या संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की यांनी की सार्वजनिक जीवनात वावरताना सगळ्याच गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे गुन्ह्यांचा तपास वैज्ञानिक पद्धतीने करणाऱ्या शास्त्राला फॉरेन्सिक सायन्स म्हणतात.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात फॉरेन्सिक सायन्स बद्दल प्रत्येकाला माहीत असायला हवे कारण गुन्हेगारीचे वाढते प्रमाण ह्या संदर्भात चौकस बुद्धी,न्यायालयात सादर केले जाणारे पुरावे नागरी विवाद गुन्हेगारी कायदे आणि सरकारी नियमांची अंमलबजावणी, आर्थिक फसवणूक कशी होते.सी आयडी यंत्रणा संदर्भात माहिती असायला हवी असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.इमरान खान यांनी केले तर आभार प्रा.नरेंद्र पाटील यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील,डॉ. हेमंत भंगाळे,डॉ.आर.डी.पवार डॉ. मयूर सोनवणे प्रा.चिंतामण पाटील, प्रा.मुकेश येवले, प्रा.मनोज पाटील, प्रा. सोनाली पाटील,प्रा.राजू तडवी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रतिभा रावते,प्रा.सुभाष कामडी, प्रा.ईश्वर पाटील,प्रा.हेमंत पाटील, मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर, दुर्गादास चौधरी.प्रमोद भोईटे, मनोज कंडारे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या