Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाकाँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याने भुसावळातील तरुण जागीच ठार !

काँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याने भुसावळातील तरुण जागीच ठार !

काँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याने भुसावळातील तरुण जागीच ठार !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भरधाव काँक्रीट मिक्सर वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे भुसावळ येथील के. नारखेडे कॉलेजचे लिपिक कुणाल राजेंद्र महाले (२५, रा. नहाटा नगर, भुसावळ) हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सहकारी निखिल शरद ब-हाटे जखमी झाले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अपघात बुधवारी (२५ सप्टेंबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर जळगाव ते बांभोरी दरम्यान जकात नाक्याजवळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल महाले व निखिल बऱ्हाटे कॉलेजच्या कामानिमित्त भुसावळ येथून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जात होते. जळगाव शहराच्या पुढे जकात नाक्याजवळ काँक्रीट मिक्सर वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला व महाले हे रस्त्यावर पडले. वाहनाच्या मागच्या चाकाखाली येऊन ते जागीच ठार झाले. दरम्यान, धडक देणारा चालक वाहनासह पसार झाला. मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.
कुणाल महाले हे तीन महिन्यांपूर्वीच भुसावळ येथील के. नारखेडे महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला लागले होते. घरात नोकरीचा आनंद असताना अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या