कामगार विरोधी वीज अधिकाऱ्यांवर कारवाई करा : कंत्राटी कामगार आंदोलन करणार !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दिपनगर येथील मुख्यअभियंता यांची कामगार विरोधी निती व मानसिकते मुळे कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले जात आहे.
मेस्को या सरकारी संस्थे द्वारे महानिर्मिती ला पुरवणारे कंत्राटी सुरक्षा कामगार सेवा निवृत्त जवान जे प्रशिक्षित आहेत. ते अनेक वर्षा पासून येथील करोडो च्या मालमत्तेचे संरक्षण करीत आहेत. त्या कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून नियमा प्रमाणे भत्ते तथा इतर सुविधा संघठीत रित्या नाकारून अन्याय केला जात आहे. या ठिकाणी मुख्य अभियंता यांची भूमीका विरोधी असल्याने हा अन्याय सुरु आहे.
विशेष म्हणजे सदर कामगारांना स्किल रेट देणे गरजेचे असताना अन स्कील वर राबवुन घेतले जाते.निवडणूकीपुर्वी सरकारने कंत्राटी कामगारांना 19,,% पगार वाढीची घोषणा केली परंतु अद्याप पर्यंत त्यांची z अंमलबजावणी न झाल्याने कामगारात संशयाचं वातावरण आहे या बाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावें दिपनगर येथिल ६६० प्रकल्प पूर्णत्वास आला असून येथे कंत्राटी कामगारांची अत्यंत आवश्यकता भासत आहे.याबाबत व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करून स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य ठेकेदार देइल
कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेकेदाराची पुर्व इतिहासचरित्र पडताळणी पाहिजे दादागिरी आणि दहशत निर्माण करणाऱ्यांना काम देण्यात येऊ नये यासाठी हे ४ फेब्रुवारी हे तीव्र आंदोलन आहे