Wednesday, March 26, 2025
Homeसामाजिककिन्ही येथे ई ग्रीन स्टेक कॅम्प संपन्न!

किन्ही येथे ई ग्रीन स्टेक कॅम्प संपन्न!

किन्ही येथे ई ग्रीन स्टेक कॅम्प संपन्न

किन्ही ता.भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथे ई ग्री स्टेक कॅम्प पिंपळगाव मंडळ भागातील पंचक्रोशीतील शेतकरी खातेदार यांना नोंदणी करून देण्याकरता महसूल प्रशासन च्या वतीने विशेष कॅम्प आयोजन करण्यात आले होते.सदर कॅम्प मध्ये शिंदी, मोंढाळे, खंडाळे, किन्ही, वेल्हाळे, साक्री, खडके येथील शेतकरी खातेदार मोठ्या संख्येत उपस्थित होते,
कॅम्पचे अध्यक्ष तालुक्याचे तहसीलदार निता लबडे, ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून किन्ही सरपंच नीलिमा सोनवणे,खंडाळे सरपंच मीराबाई पाटील,मंडळ अधिकारी एफ.एस खान,उपस्थित होते,
कार्यक्रम मदत म्हणून मंडळातील सर्व ग्राम महुसल अधिकारी ,कोतवाल, ग्राम पंचायत सदस्य, सीएससी,यांनी काम केले.कॅम्प मध्ये उपस्थितांचे आभार किन्ही ग्राम महसूल अधिकारी प्रमोद ठोसर यांनी मानले .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या