किरकोळ कारणावरून एकाने केले दोघांवर ब्लेडने वार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विनाकारण शिवीगाळ करू नको, हे हे सांगण्याचा राग आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाने दोघांवर ब्लेडने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सौरभ संजय मुंदाणकर आणि संजय सुधाकर मुंदाणकर हे दोघे १ रोजी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत उभे असताना, विजय नामदेव पाटील (ढेकू रोड) हा आला आणि शिवीगाळ करू लागला. संजय याने त्याला समजावले. मात्र याचा त्याला राग आला आणि त्याने खिशातील ब्लेडने हातावर, कानावर, पाठीवर ब्लेडने वार केले. संजय हा त्याचठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संजयचा मुलगा सौरभ भांडण आवरायला गेला असता, विजयने त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्यावर ब्लेडने वार केले. यात सौरभहाही जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत सौरभ याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११५, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हेकॉ. प्रमोद पाटील करीत आहेत.