Thursday, March 27, 2025
Homeजळगावकुऱ्हे पानाचे जय बजरंग गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा डिवायएसपींनी सन्मानचिन्ह देऊन केला गौरव

कुऱ्हे पानाचे जय बजरंग गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा डिवायएसपींनी सन्मानचिन्ह देऊन केला गौरव

कुऱ्हे पानाचे जय बजरंग गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा डिवायएसपींनी सन्मानचिन्ह देऊन केला गौरव
( खान्देशलाईव्ह न्यूज  भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ तालुका ग्रामिण पोलिस ठाणे अंतर्गत उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी पोलिसांच्या वतीने भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर गणराया सन्मान अवार्ड पारीतोषीक योजना जाहिर केली होती.
अंतर्गत यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आपल्या मौलिक कामगिरीच्या बळावर सामाजिक

 

जडणघडणीमध्ये सकारात्मक भर घालणा-या गणेश मंडळांचा सन्मान व्हावा या दृष्टीकोनातून, भुसावळ तालुका पोलिस अधिकारी कर्मचारींनी भुसावळ क्षेत्रात अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्याचे नियोजन केले होते.याकामी सार्वजनिक गणेश मंडळाचे परीक्षण करण्यासाठी एक परीक्षण समिती गठित करण्यात येऊन समिती पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांचे परीक्षण करून यात उत्कृष्ट गणेश मूर्ती, उत्कृष्ट आरास / देखावा, राबविलेले समाजोपयोगी कार्यक्रम, पोलीसांचे पाळलेले निर्देश, विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धता या पाच मुद्यांनूसार कार्य दिसेल अशा मंडळाचा सन्मान केला जाईल समीती निर्देशना नुसार तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकमेव कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ येथील जय बजरंग गणेश मंडळाची आदर्श व विधायक गणेशोत्सवाची संकल्पना साकार होणे करीता आपण सहभाग नोंदविला होता. या उल्लेखनिय कार्याबद्दल प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आपण यापुढेही अशीच उल्लेखनिय कामगीरी कराल या अपेक्षेवर भुसावळ उपविभागीय पोलस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश

 

Oplus_131072

गायकवाड यांनी निवड केली आहे.त्याचप्रमाणे पाचही प्रकारात सर्वोत्कृष्ट ठरणा-या कुऱ्हे पानाचे जय बजरंग गणेश मंडळास संबंधीत पोलीस स्टेशनचे पातळीवरील प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यात सर्वोत्तम ठरणाऱ्या कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ. जय बजरंग गणेश मंडळास सन्मानित करण्यात येऊन. सार्वजनिक जय गणेश मंडळाने ध्वनी मर्यादेचे उल्लंघन टाळून पोलीसांनी वेळोवेळी दिलेले निर्देश पाळलेत व विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून समाजाच्या सकारात्मक जडणघडणीस आपला हातभार लावला असे विविध समाजोपयोगी कौतुकास्पद कार्य केल्याप्रकरणी सन्मानीत करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या