Tuesday, April 29, 2025
Homeकृषीकेळी कापणारे चोरटे दर आठवड्याला १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान करीत...

केळी कापणारे चोरटे दर आठवड्याला १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान करीत आहे.

केळी कापणारे चोरटे दर आठवड्याला १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान करीत आहे.

आज पुन्हा निर्मल चोपडे यांचे ५ ते १० हजार केळीचे खड अज्ञातांनी कापले.

पोलिसांना मोठे आवाहन.

यावल दि.११  खानदेश लाईव्ह न्युज   प्रतिनिधी.     यावल शिवारात जुन्या अट्रावल रोडवर यावल येथील निर्मल नथू चोपडे यांच्या शेतातील ५ ते ६ हजार केळीचे घड अज्ञात माथे फिरूने जाणून-बुजून कापून निर्मल चोपडे या शेतकऱ्याचे अंदाजे १२ ते १३ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचे कृत्य आज शनिवार दि.११ रोजी सकाळी उघडकीस आली हे कृत्य जाणून बुजून अज्ञात माथे फिरू व्यक्तींनी रात्रीच्या वेळेस करून शेतकऱ्यांना व यावल पोलिसांना मोठे आवाहन निर्माण केल्याचे बोलले जात आहे. याबाबत नागरिकांचे तथा शेतकऱ्यांचे कैवारी आमदार अमोल जावळे यांनी आपले लक्ष वेधून शासकीय,सामाजिक यंत्रणेच्या माध्यमातून या माथे फिरू अज्ञात व्यक्तींचा बंदोबस्त कसा करणार याकडे आता संपूर्ण यावल तालुक्याचे लक्षण आहे.

गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे यावल शिवारात केशव गोवर्धन चौधरी यांच्या शेतातील केळीचे घड कापून ५ ते ७ हजार रुपयाचे नुकसान केले आठ दिवस झाल्यानंतर पुन्हा त्याच शिवारात केळीचे घड कापणारे पटाईत अज्ञात गुन्हेगार कोण आहेत याचा शोध पोलीस,सामाजिक, राजकीय, शासकीय यंत्रणा कोणत्या माध्यमातून लावणार.. अज्ञात केळीचेच घड का कापतात..? केळी घड कापणाऱ्यांची दादागिरी ही कशासाठी आणि का आहे..? केळीचे गट कापणारे कोण आहेत.? याबाबत यावल शहरात दबक्या आवाजात चर्चा असून अज्ञात केळी घड कापणाऱ्यांवर कारवाई का नाही..? याबाबत सर्व स्तरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या