Monday, March 17, 2025
Homeजळगावकोथळी येथील मुलींच्या छेडखानी प्रकरणी लेवा पाटीदार समाजाचा जाहीर निषेध : भोरगाव...

कोथळी येथील मुलींच्या छेडखानी प्रकरणी लेवा पाटीदार समाजाचा जाहीर निषेध : भोरगाव लेवा पंचायतीने दिले प्रांतांना निवेदन

कोथळी येथील मुलींच्या छेडखानी प्रकरणी लेवा पाटीदार समाजाचा जाहीर निषेध : भोरगाव लेवा पंचायतीने दिले प्रांतांना निवेदन
फैजपूर : खानदेश लाईव्ह प्रतिनिधी

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची कोथळी येथील यात्रेत समाज कंटाकांकडून छेड काढण्यात आली. ही केवळ लेवा समाजासाठी नाही तर सर्वच समाजातील माता भगिनींच्या अस्मितेचा अपमान करणारी बाब आहे. अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास समाजात याचे वाईट परिणाम बघावयास मिळतील. यावर कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे. यातील आरोपींना पाठीशी न घालता त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा लेवा समाज्यातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे निवेदन भोरगाव लेवा पंचायत छाया पाडळसे यांनी प्रांताधिकारी तथा उपविभागिय अधिकारी बबनराव काकडे यांना देण्यात आले आहे. या घटनेचा संपूर्ण लेवा समाजातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या