कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोज !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आज दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप सपकाळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
महर्षी वाल्मिकींनी श्रीरामाच्या जन्माआधी रामायणाची रचना आपल्या दिव्य दृष्टीतून केली. रामायणासारखा दिव्य ग्रंथ त्यांनी विश्वाला अर्पण केला. या ग्रंथाद्वारे नव समाजाची निर्मिती बंधुप्रेम, एक पत्नी व्रत, पितृ आज्ञेचे पालन, सदाचाराची शिकवण त्यांनी सर्व मानव जातीला दिली. अशा थोर महात्म्याच्या जीवनाद्वारे मानव जातीला दिव्य प्रेरणा मिळते असे प्रदीप सपकाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे .यावेळी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सुद्धा आपले मनोगतात सांगितले की आद्यकवी महर्षी वाल्मिकी हे कोळी बांधवांचेच आद्य दैवत असले तरी त्यांनी रामायणाची रचना ही फक्त कोळी बांधवांसाठी केली नसून त्यांनी या महान ग्रंथाद्वारे संपूर्ण जगाला शिकवण दिलेली आहे. कार्यक्रमाला उपस्थित
नितीन सोनवणे (उपाध्यक्ष कोळी समाज विकास मंडळ)
वसंत सपकाळे, शांताराम कोळी, भागवत सपकाळे, रविंद्र बाविस्कर, दीपक सोनवणे, संदीप कोळी, धर्मा कोळी, गोकुळ सपकाळे, दत्तात्रय सपकाळे, महारु कोळी,दिलीप सोनवणे, कार्तिक सोनवणे आदी समाज बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक सोनवणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त कोळी समाज बांधवांनी परिश्रम घेतले .