खडका गावातील समाज बांधवांचे तालुका पोलीस निरीक्षकांना निवेदन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती मिरवणुकीला परवानगी देण्याची केली मागणी.
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ( वा) भुसावळ शहराला लागून असलेल्या खडका गावातील बौद्ध समाज बांधवांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी संबधिची परवानगी पोलीस प्रशासना कडुन तात्पुरती नाकारण्यात आली होती. यंदा आम्हाला जयंती मिरवणुकीची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी खडका गावातील बौद्ध बांधव व महिला तसेच गावातील प्रतिष्ठीत लोकांनी परवानगी देण्यात यावी यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांना ९ एप्रिल रोजी निवेदन दिले.
दरवर्षी खडका गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात येते. मात्र सन २०२३ साली गावापासून काही अंतरावर असलेल्या साकरी फाट्यावरील रस्त्यावर अप्रिय घटना घडली होती. त्या कारणास्तव सन २०२४ साली खडका गावातील जयंती मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. तुम्हाला पुढच्या वर्षी परवानगी दिली जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले होते असे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र यंदा देखील जयंती मिरवणुकीला तात्पुरती परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आल्याने खडका गावातील लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. त्या घटनेचा व जयंती उत्सव मिरवणुकीचा काही संबंध नसल्याचे तालुका ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांना वारंवार सांगितल्या नंतर मिरवणुकीला परवानगी देण्यात येईल मी वरिष्ठांना कळवतो असे त्यांनी सांगितले. मात्र समाज बांधवांचे समाधान होत नव्हते. तेव्हा पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी मिरवणुकीचा विषय सकारात्मक असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. वरिष्ठांना सांगुन १२ एप्रिल पर्यंत परवानगी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी उत्सव समिती अध्यक्ष अर्जुन सपकाळे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे
माजी अध्यक्ष विनोद सोनवणे, पोलीस पाटील दारासिंग पाटील, चुडामन भोळे, अनिल महाजन यांच्या सह गावातील प्रतिष्ठीत उपस्थित होते.