Monday, April 28, 2025
Homeजळगावखळबळजनक : भुसावळ तालुक्यात एकाच घरामध्ये एक-दोन नव्हे तर आढळले चक्क २७...

खळबळजनक : भुसावळ तालुक्यात एकाच घरामध्ये एक-दोन नव्हे तर आढळले चक्क २७ साप !

खळबळजनक : भुसावळ तालुक्यात एकाच घरामध्ये एक-दोन नव्हे तर आढळले चक्क २७ साप !

वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील वरणगावातील एका घरामध्ये सापाची एक-दोन नव्हे तर चक्क २७ पिल्ले आढळून आली. सर्पमित्रांनी त्यांना सुखरूपपणे रानातील तलावाकाठी सोडले. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. परंतु या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, छत्रपती शिवाजी महाराजनगरमधील दीपक संजय सोनार यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पोकळ झालेल्या फरशीखालून सापाची पिल्ले अनिता सोनार यांना आढळली होती. त्यांनी लागलीच समोरील राहत असलेल्या दीपक पांडुरंग सोनार यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी घरातील फरशा उचलून बघितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्या ठिकाणी सापाची लहान मोठी पिले इकडून तिकडे पळताना दिसली. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. त्यावेळी शेजारील तरुण मदतीसाठी धावली व त्यांनी मोठ्या शिताफीने सर्व पिलांना पकडून सुखरूपपणे रानातील तलावाकाठी नेऊन सोडले.

दरम्यान, घरात तब्बल २७ साप निघाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सर्पाना पाहण्यासाठी शेजारी-पाजाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. सापाची ही पिल्ले पानधिवड प्रकारातील असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या