Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाखळबळजनक :  मुंबईत बेस्टने चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू !

खळबळजनक :  मुंबईत बेस्टने चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू !

खळबळजनक :  मुंबईत बेस्टने चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू !

मुंबई वृत्तसंस्था – मुंबईतील कुर्ला उपनगरात बेस्टची इलेक्ट्रिक बस भरधाव वेगात गर्दीत घुसली आणि रिक्षासह, खासगी वाहने आणि प्रवाशांनाही धडक दिली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.आफरिन रसूल शाह (१९), आझम शेख (२०), कनिस फातिमा कादरी (५५) आणि शिवम कश्यप अशी मृतांची नावे आहेत. आरोपी बसचालक संजय मोरे (५०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ब्रेक फेल झाल्याचे चालकाचे

 

Oplus_0

म्हणणे आहे. याबाबत आरटीओचे पथक अधिक तपासणी करत आहे.  कुर्ला पश्चिमेकडील महापालिकेच्या एल वॉर्ड कार्यालय परिसरात सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोन जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोहीनूर रुग्णालयात आणखी एकाचा मृत्यू झाला तर दोन जण अत्यवस्थ आहेत.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिमेकडील बेस्ट बसस्थानकाहून ३३२ क्रमांकाची बस (एम.एच.०१, इ.एम.८२२८) अंधेरी स्थानकाकडे निघाली होती. या बसने रस्त्यावरील रिक्षासह खासगी वाहने आणि प्रवाशांनाही धडक दिली. जखमींना तात्काळ भाभा रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच येथे स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या