Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाखुन्नस दिल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी ; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

खुन्नस दिल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी ; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

खुन्नस दिल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी ; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील विटनेर येथील मराठी शाळेजवळ जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, तालुक्यातील विटनेर गावात असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात घराच्या अतिक्रमण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दावा टाकण्यात आला होता. या जुन्या वादातून आणि खुन्नस देण्यावरून गुरुवारी सकाळी १०:३० वाजता गावातील मराठी शाळेजवळ दोन्ही गट समोरासमोर आले. यात पहिल्या गटातील अजिंक्य राजू गोलांडे (वय-२२) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की गावातील ग्रामपंचायत सदस्य सागर ईश्वर दिवाने याच्या विरोधात त्यांचे काका सुरेश गोलांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपात्र करण्यासाठी अर्ज केला होता. याचा राग धरून सागर दिवाने, आकाश दिवाने, धनराज सुनील खोंड आणि भारत प्रभाकर दिवाने (सर्व रा. विटनेर) यांनी अजिंक्य गोलांडेसह त्याच्या घरातील नातेवाइकांना मारहाण केली. दुसऱ्या गटातील धनराज सुनील खोंड (वय-२०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, संशयित आरोपी सुरेश बाबुलाल गोलांडे, प्रशांत सुरेश गोलांडे, अक्षय सुरेश गोलांडे, अजिंक्य राजीव गोलांडे आणि वसंता बाबूलाल गोलांडे (सर्व रा. विटनेर) यांनी जुन्या वादातून खुन्नस देत धनराज खोंड आणि त्याचे नातेवाईक यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेले त्याचे आई, मित्र आणि इतरांना देखील मारहाण केली. या संदर्भात दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून परस्पर विरोधात एकूण ९ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या