खून करून पळून जाणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश
भुसावळ जीआरपी पोलिसांची संयुक्त कारवाई
भुसावळ ( खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी )
पिंपरी चिंचवड (पुणे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित आरोपीनं एका व्यक्तीचा खून केला होता .
सदरचा आरोपी गाडी पुणे- दानापूर एक्सप्रेस क्रमांक ०११४३ ने पळून जात असल्याचा संशय पुणे पोलिसातर्फे फोटो आणि माहिती सहीत भुसावळ आरपीएफ निरीक्षक तसेच भुसावळ जीआरपी निरीक्षकांना देण्यात आला होता.
या संदेशानुसार गाडी भुसावळला पोहोचल्यावर निरीक्षक एन.के.सिंग, एएसआय-दीपक कावळे आणि कर्मचारी, एएसआय-दीपक तायडे आणि सीपीडीएस टीमचे कर्मचारी, जीआरपी भुसावळचे एपीआय किसन राख, एचसी-दिवाणसिंग राजपूत आणि पीसी-बाबू. मिर्झा आणि शहर पोलिसांनी भुसावळचे एपीआय-राहुल भंडारे, एसआयपीएफ-संजय पाटील आणि कर्मचाऱ्यांसह संयुक्त पथक प्लॅटफार्म वर तैनात केले होते.
भुसावळ येथे ही गाडी सांयकाळी साडेआठ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर पोहोचल्यावर पूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली. अखेर जनरल डब्ब्यातून फोटोमध्ये दर्शविलेल्या संशयित आरोपीला आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे .
याबाबतची माहिती
पिंपरी चिंचवड (पुणे) पोलिसांना देण्यात आली आहे. जयप्रकाश साडे वय २१ वर्षे राहणार बिहार असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
संशयित आरोपीविरुद्ध पिंपरी चिंचवड (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी व त्याच्या दोन साथीदारांना पुढील कारवाईसाठी देहू रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जी आर पी व पोलीस पथकाच्या सतर्कतेने सदर आरोपी पोलिसांना सापडला आहे .