Monday, April 28, 2025
Homeजळगावगजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणेचे काम सुरू.

गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणेचे काम सुरू.

गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणेचे काम सुरू.
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

यावल दि.२१    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.    यावल येथील एसटी बस स्टॅन्ड जवळ विरारनगर भागात संपूर्ण यावल शहरातील भाविक भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या नारळ फोडून करण्यात आला.या परिसरात नेहमीप्रमाणे विकास कामांमध्ये मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणेचे काम व्हावे म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना विनंती पत्र देऊन निधीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले.
यापूर्वी अतुल पाटील पाटील नगराध्यक्ष असताना मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात आला होता.व परिसरामध्ये बगीचा निर्मिती करण्यात आलेली आहे. गजानन महाराज भक्त परिवार, भाविकांनी व परिसरातील रहिवासी,नागरिकांनी मंदिरा समोरील चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी अतुल पाटील यांचेकडे केली होती.त्या अनुषंगाने पाटील यांनी सदरचा निधी जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करून आणला होता नंतर निविदा प्रक्रिया होऊन कामाची सुरुवात करण्यात आली आहे.हे काम नगर्रोत्थान योजनेतून मंजूर असुन कामाची सुरुवात येथील प्रसिद्ध उद्योजक भैय्यासाहेब चौधरी, निवृत्त प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन,निवृत्त नायब तहसीलदार पी.एम.जोशी,प्रा.अशोक काटकर, प्रा.संजय कदम,मनिष दादा चौधरी, शरद चतुर,महेश सराफ,विजय चौधरी यांचे हस्ते नारळ वाहुन कऱण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,अनिल पाठक, अशोक भंडारी,वासुदेव आमोदकर, प्रमोद बापू,नीलेश पाटील उपस्थीत होते.पेव्हर ब्लॉक बसविणेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी अतुल पाटील यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या