Monday, March 24, 2025
Homeजळगाववरणगाव येथे गणेश भक्तांसह शिव प्रेमींची देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी !

वरणगाव येथे गणेश भक्तांसह शिव प्रेमींची देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी !

वरणगावला रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज विराजमान प्रतिकृतीच्या देखाव्याने शहरवासीयांचे वेधले लक्ष

शिवबा मंडळाने टाकाऊ वस्तूंपासून बनविला चबुतरा

वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव येथील मोठा माळी वाड्यातील शिवबा मित्र मंडळ संचलित सार्व.फुले गणेश मंडळाने या वर्षी बाप्पा विराजमान असलेल्या जागी शिवराज्याभिषेक दिनाचे यंदा 351 वर्षे आहे. त्यानिमित्ताने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज विराजमान असल्याची १२ बाय ८ फुटाची प्रतिकृती देखावा सादर केला आहे. शहरातील गणेश भक्तांसह शिवभक्तांची देखावा पाहण्यासाठी मोठा माळी वाडा येथे मोठी गर्दी होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातील मनमोहक गणेश मूर्ती आणि देखाव्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिवबा मित्र मंडळ संचलित सार्व.फुले गणेश मंडळाचे यंदा ३१ वे वर्ष आहे. शिवबा मित्र मंडळाने यापूर्वी देखील श्री संत सावता महाराज यांची कांदा, मुळा, भाजी लावलेल्या शेतीचा देखावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग आणि वीर सावरकर यांना झालेल्या काळ्या पाण्याची शिक्षेचा प्रसंग सजीव देखाव्यांच्या माध्यमातून साकारला होता. तसेच मागच्या २०२३ वर्षी देखील चंद्रयान -३ च्या देखावा पाहण्यासाठी वरणगावसह परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

दररोज सायंकाळी छत्रपतींची शिवाजी महाराजांची होते आरती

शिवराज्याभिषेक दिनाचे 351 वर्ष असल्यामुळे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज विराजमान असलेल्या मनमोहक रूपात श्री गणेश मूर्तीची सायंकाळी ७.३० वाजता गणपती आरतीसह छत्रपती शिवाजी महाराजांची आरती देखील म्हटली जाते..यावेळी सर्वदूर भक्तिमय आणि शिवमय वातावरण निर्माण होते..यावेळी महिला-पुरुष बालगोपाळ तरुण यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

टाकाऊ वस्तूंपासून बनविला किल्ला रायगडावरील चबुतरा

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज विराजमान असलेल्या चबुतराची प्रतिकृती करण्याकरिता गणपती विराजमान होण्याच्या १५ ते २० दिवस अगोदरच आम्ही मोठ-मोठे पृष्ठ, कापड, लाकूड, पाईप, नळी, सुतडी या टाकाऊ वस्तूपासून रायगड किल्ल्यावरील चबुतरा बनवण्यासाठी सुरुवात केली. गणपती विराजमान होण्याच्या एक दिवस अगोदर उंचीला १२ फूट आणि रुंदीला ८ फुट असा हा चबुतरा आम्ही पूर्ण केल्याचा एक मनाला आनंद आणि समाधान देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत असल्याने हा देखावा करताना आम्हाला ऊर्जा मिळत असल्याचे तेजस माळी, पांडू माळी, हर्षल माळी, विवेक माळी, निखिल माळी यांनी सांगितले.

रायगड किल्ल्यावरील प्रतिकृती बनवण्यासाठीचे सहकार्य संकेत माळी, शुभम माळी, उमेश माळी, रितेश माळी, पप्पू माळी, मयुर माळी, विरेंद्र माळी, भूषण माळी, यश माळी, ओम माळी, किरण माळी, भूषण माळी, विशाल माळी, भावेश माळी यांनी परिश्रम घेतले. शिवबा मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, प्रवीण माळी, बापू माळी, गणेश माळी, भूषण माळी, छोटू माळी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या