गणेश विसर्जनाला साईभक्त पिंटू कोठारी परीवाराकडून महाप्रसादाचा यशस्वी कार्यक्रम
भुसावळ, ता. १८ : अंनत चतुर्थी यादीवशी मंगळवार ( ता. १७ ) गणेश विसर्जनाचे निमित्त साधुन नगरसेवक पिंटू ( निर्मल ) कोठारी यांनी बाप्पांचे विसर्जन करणारे आणि विसर्जन करून येणाऱ्या गणपती भक्तांच्या सेवेकरीता शहरातील सुमारे पंचविस हजार गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश भक्तांनी भाजीपुरी व मसालेदार खिचडीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला
अन्न हेच पूर्णब्रम्ह” या एका वाक्यात पूर्ण ब्रह्मांडाची व्याप्ती सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. अन्न ही पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची महत्वाची गरज आहे. मानव, पशु, पक्षी, वनस्पती, कीटक इ. हिंदू संस्कृती मध्ये अन्न दानाला महत्व दिले गेलेले आहे. महाप्रसादाच्या माध्यमातुन अन्नदानाची पूर्वी पासून चालत आलेली प्रथा आहे. सर्वश्रेष्ठदान करण्यासाठी भुसावळ शहरातील सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रसर असलेल्या पिंटू ( निर्मल ) कोठारी यांचे सह त्यांचा परीवार निमित्ताच्या शोधात असते. आणि आयतेच गणेश विसर्जन हे निमित्त समोर आले. मंगळवार ( ता. १७ ) अनंत गणेश चतुर्थीला शहरात घरांतील आणि सार्वजनिक बाप्पा विसर्जना करीता गणेशभक्तांची यावल रोडलगत तापी
नदीपात्राकडे गर्दी जात असतांना साईजिवन सुपर शॉपीबाहेर कोठारी यांनी सकाळी ८ वाजे पासुनअन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पंचविस हजार गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
महाप्रसादात पुरीभाजी व मसाला खिचडी सोबतच भाविकांना थंडगार पाणीही उपलब्ध करून देण्यात आले. वाहतूक कोंडी होवू नये तसेच वाहतुकीवर परीणाम होणार नाहि.या साठी साईजीवन सुपरशॉपच्या कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते. भाविकांसोबतच या उपक्रमात पालिकेतर्फे तैनात जिवनरक्षक दलाचे कार्यकर्ते, पालिका कर्मचारी आदींनाही जागेवर पोच प्रसाद देण्यात आला
. या उपक्रमात नगरसेवक निर्मल कोठारी, अजीत कोठारी, प्रवीण घिया, आकाश जोशी, प्रथमेश गुलईकर, दीपक नेमाडे, क्रिश कोठारी, संजय कुकरेजा, गजानन चव्हाण, उमेश पाटील, पवन महाजन, नीलेश वाटोळेकर, किरण मिस्तरी, भुषण काटकर आदींसह साईजीवन सुपर शॉपीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात सहकार्य केले.महाप्रसाद ठीकाणी मंडप बांधून नागरिकांची जेवणाची, स्वयपाकाची व्यवस्था केली होती. गेल्या ७ते ८ वर्षांपासून महाप्रसादाचा कार्यक्रम कोठारी परीवाराकडून स्वखर्चाने बिन चुक करीत आहे