गावठी कट्टयासह मुक्ताईनगरचे दोघे वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुक्ताईनगरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर हॉटेल चाहेल जवळील वरणगाव फॅक्टरी मार्गालगत गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगुन असलेले दोन संशयीत रविवार ( ता. २२ ) संध्या ५ वा. वरणगाव पोलिस पथकाच्या जाळ्यात अडकले असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव पोलिस स्टेशन हद्दीत रविवार ( ता. २२ ) सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मीळाली की मुक्ताईनगर दिशेने जाणाऱ्या महामार्गावर हॉटेल चाहेल जवळील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी कडे जाणाऱ्या मार्गावर कोणीतरी दोन इसम गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगुन घेऊन असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुशंगाने सहाय्यक पोलिस नीरीक्षक भरत चौधरी यांनी पोलिस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे, पोलिस कर्मचारी यासीन पिंजारी, मनोज म्हस्के, प्रेमचंद सपकाळे, ईश्वर तायडे आदी. यांचे पथक तयार करून माहिती अवगत करून दीली त्यांनुसार पथकाने मिळालेल्या माहिती व घटने नुसार शिताफिने सापळा रचुन दोघांना संध्या ५ वाजता ताब्यात घेऊन चौकशी केली असता सिध्दार्थ संतोष भालेराव ( वय २३ ), अनिरूध्द कैलास ठाकुर असे त्यांचे नावे समजली त्यांची अंग झडती घेतली असता त्यांचा जवळ२५००० रु.किंमतीचा एक गावठी कट्टा, ४०००रू. किं.चे दोन काडतूस, ५०००रु. किं. चे मॅगझीन असा एकुण ३४०००रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना वरणगाव पोलिस स्थानकात आणले असता जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजकुमार शिंदे, यांचे मार्गदर्शना खाली वरणगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि भरत चौधरी पोउनि रामदास गांगुर्डे वरणगांव पोलिस स्थानकात कारवाई केली आहे.