गावठी पिस्टल व जिवंत काडतुससह संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एक इसम अग्निशस्त्र (गावठी पिस्टल) व एक जिवंत काडतुससह शहरातील खडका रोडवरील नवीन ईदगाह जवळ येणार असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी साफळा लावून संशयित आरोपीला अग्निशस्ञ (गावठी पिस्टल )सह ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की याकुब मोहम्मद खान वय ( वर्ष २४) राहणार खडका रोडवरील अक्सा नगर , नवीन ईदगाजवळ हा अग्नी शस्त्र घेऊन कोणता तरी गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने येत आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बाजारपेठ , पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोहेका विजय नेरकर पोहेका निलेश चौधरी महेश चौधरी राहुल वानखेडे बोका प्रशांत परदेशी योगेश माळी अशांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयित आरोपीला पकडले असता त्याच्या अंगझडतीत १५ हजार रुपये किमतीची एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह त्यास तपकिरी रंगाची प्लास्टिकची ग्रीप असलेला किंमत अंदाजे १ हजार रुपये किमतीची व एक जिवंत राऊंड काडतुस एकुण 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव ,पोहेकाॅ विजय नेरकर, निलेश चौधरी ,महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, अमर अढाळे यांनी केली आहे.