Monday, March 24, 2025
Homeगुन्हागावठी पिस्तूल घेवुन दहशत माजविणाऱ्याला रवंजे येथे अटक

गावठी पिस्तूल घेवुन दहशत माजविणाऱ्याला रवंजे येथे अटक

गावठी पिस्तूल घेवुन दहशत माजविणाऱ्याला रवंजे येथे अटक

एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील रवंजा गावात हातात गावठी पिस्तूल बाळगत गावात दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शस्त्रा सह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून २५ हजार रुपये किंमतीचा कट्टा ही जप्त करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील रवजा गावातील प्रवीण कोळी हा दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगतो.
या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रवजा बुद्रुक येथे जाऊन प्रवीण कोळीचा शोध घेतला.
एलसीबीच्या पथकाने संशयित आरोपी प्रविण कोळी याला अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. पोलिसांनी २५ हजार रुपये किंमतीचा कट्टा जप्त केला आहे. आरोपी प्रवीण अशोक कोळी (वय २२, रा. रवंजा बुद्रुक, ता. एरंडोल) याच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, जळगाव एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश वाघमारे, पोह संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या