Sunday, March 16, 2025
Homeगुन्हागावी परत जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

गावी परत जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

गावी परत जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पिंप्री येथील युवक शिवम ऊर्फ शिवा रमेश जाधव (वय ३०) हा त्याच्या मोटारसायकलने (एमएच १९ – ईबी ६७५०) रावेरहून गावी परत जात असताना अज्ञात वाहनचालकाने त्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ही घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहेत. ३ ऑक्टोबर रोजी रावेर पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंप्री येथील युवक शिवम उर्फ शिवा रमेश जाधव हा रावेरहून मोटारसायकलने घरी जात असताना, त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. पोलिसात खबर न देताच घटनास्थळावरून वाहनचालक पसार झाला. शिवम गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला.अपघातासंबंधी काही ठोस माहिती मिळते का? यासंबंधी आप्तेष्टांनी प्रयत्न केला; मात्र, काहीच तपास लागला नाही. शेवटी ३ रोजी विनोद लालचंद जाधव यांनी रावेर पोलिसात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजेंद्र राठोड, पो.कॉ. गोपाळ ठाकूर पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या