Monday, March 17, 2025
Homeगुन्हागिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचोरी करणाऱ्या चौघांना अटक !

गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचोरी करणाऱ्या चौघांना अटक !

गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचोरी करणाऱ्या चौघांना अटक !

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक जोरदार सुरू असून पाचोरा पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. दि. २७ रोजी मध्यरात्री गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचोरी करणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तीन ट्रॅक्टरसह एक डंपर जप्त करण्यात आला आहे.वाळूवाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलिस पथकास सूचित केले. यावेळी पथकाने ३ ट्रॅक्टर व १ डंपर व त्यातील ९ ब्रास वाळूसह ६३ लाखाचा मुद्देमाल जप्त करीत चारजणांना अटक केली. यासह अन्य दोघे अशा ६ जणांविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले. पोउनि योगेश गणगे, सुनील पाटील, सपोउनि पांडुरंग सोनवणे, पोहेकों राहुल शिंपी, भोजराज धनगर यांनी मध्यरात्री एक डंपर व तीन ट्रॅक्टर जप्त केले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या