Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हागिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे मशीन जप्त !

गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे मशीन जप्त !

गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे मशीन जप्त !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अवैध वाळू चोरीविरुद्ध कारवाई सुरूच असून तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदी पात्रात अवैधपणे वाळूचे उत्खनन करणारे मशीन महसूल पथकाने जप्त केले. ही कारवाई २८ डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात कालिंका माता चौकात झालेल्या अपघातानंतर वाळूविरुद्ध कारवाई सुरू आहे. त्यात तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू असताना महसूल पथकाने रात्री कारवाई केली. यावेळी नदीपात्रात लोखंडी वायर रोपफावडा मशीन आणि उपसा केलेली पाच ब्रास वाळू आढळून आली. पथकाने हे सर्व साहित्य जप्त केले.
याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या