गेट टुगेदर मध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सध्याच्या परिस्थितीत बहुसंख्य शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या वर्गातील सर्व मित्रांचा अनेक वर्षांच्या भेटीचा गेट-टुगेदर द्वारे भेटीचा कार्यक्रम आपल्या जन्मभूमी संस्कारभूमीवर होत आहेत.
जन्मभूमी म्हणजे आपण आई-वडिलांसोबत राहत असलेले ठिकाण कारण आपला जन्म हा पूर्वी मामांकडे होत असे . नंतर आपण आई-वडील असलेल्या गावात लहानाचे मोठे होत असतो.गेट-टुगेदर मध्ये सर्व बाहेरगावी नोकरी निमित्त गेलेले सर्व वर्गमित्र आपल्या आई-वडिलांसोबत आपण ज्या भूमीवर लहानाचे मोठे झालो. जे बालपणी आपणावर संस्कार झाले त्या भूमीवर एकत्रित येत असतो. बालपणी जे संस्कार आपल्यावर होत असतात त्याद्वारे आपली वाटचाल होत असते त्या संस्काराद्वारे आपण पुढे गेलेला असतो. गेट-टुगेदर कार्यक्रमांमध्ये सर्व मित्र एकत्र येऊन आपण आज रोजी काय करत आहोत याबद्दल प्रत्येक जण आपली माहिती देत असतो माझा स्वतःचा हा अनुभव आहे.आम्ही सर्व दहावीपर्यंत शिकलेले मित्र बऱ्याच वर्षानंतर चाळीस विद्यार्थी एकत्र आलेले होते. सर्व मित्र एकत्र बसून प्रत्येक जण आपण काय करत आहोत आणि आतापर्यंत काय करत आलो याबाबतीत एकत्र बसलो असता चाळीस मधून 35 मित्रांनी त्यांचा परिचय करून देताना विशेष बाब म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाने आपण सामाजिक कार्यासाठी इतर गरजवंतांसाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याचे सांगितले.
आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी नोकरी करत असताना सामाजिक कार्यात इतरांसाठी खर्च करत आहे याचा अर्थ बालपणी पडलेले संस्कार आहेत. गेट-टुगेदर कार्यक्रम करताना आपण जे सामाजिक कार्य करत आहोत ते फक्त आपल्या वर्गातील मित्रांना सांगत आहोत बहुसंख्य ठिकाणी आपण शिकत असलेल्या शाळेचे नाव सुद्धा बदललेले आहेत परंतु आपण ज्या गावात राहून पुढे गेलो त्या गावाचा व तेथील भूमीचा अभिमान माझे गाव माझा अभिमान म्हणून कायम आपणास व आपल्या परिवारास कायम आठवण म्हणून आपल्या नावाने आपले कर्तव्य म्हणून आपण ज्यामुळे पुढे गेलो त्याआपल्या संस्कार भूमीत आवश्यक असलेल्या आपल्या परीने वृक्ष देवतेची दीर्घ काळ टिकणारे ऑक्सिजन युक्त झाडे संगोपना सहित खर्च आपल्या गावातील सुदामा जवळ देऊन आपल्या गावाला आपली ओळख याद्वारे आपोआप होईल. गेट-टुगेदर द्वारे म्हणजेच लोकसहभागातून दीर्घ काळ टिकणारे ऑक्सिजन युक्त झाडे संगोपणा सहित वृक्षारोपण झाल्यास प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल व आपले गाव आपला अभिमान काही वर्षातच पर्यावरण मुक्त होण्यास मदत होईल हा एक चांगला उपक्रम असल्याची माहिती पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी दिली आहे .