Wednesday, March 26, 2025
Homeजळगावगेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह !

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह !

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता मुलाचा आढळला मृतदेह !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धनीश कुंवरसिंग चौहान (वय १५, रा. लखनपूर, जि. बडवाणी, ह.मु. कठोरा, ता. जळगाव) या मुलाचा मृतदेह एका विहिरीत मिळून आला. ही घटना शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील चौहान कुटुंब कामानिमित्त जळगाव तालुक्यातील कठोरा येथे वास्तव्यास आहे. या कुटुंबातील धनीश हा मुलगा दि. ७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर मिळून न आल्याने या प्रकरणी दि. ८ सप्टेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी कठोरा येथील भरत मुरलीधर जाधव यांच्या शेतातील विहिरीत एका मुलाचा मृतदेह असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली.घटनास्थळी पोउनि गणेश सायकर, पोहेकॉ अनिल फेगडे, किरण आगोणे व अन्य सहकारी पोहचले. धनीश चौहान हा मुलगा हरविल्याची नोंद असल्याने त्याचे कुंवरसिंग चौहान यांना बोलविण्यात आले. त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर हा मृतदेह धनीशचाच असल्याचे त्यांनी ओळखले. हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या