गोरगरीब धान्य मिळण्या साठी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष यांच्या कडून तहसीलदार यांना घेराव
रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी रावेर तालुक्यात रेशन दुकानावर धान्य मिळण्यासाठी शिवसेना (शिंदे गट )रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्ष सौ. नंदाताई निकम यांचेकडून तहसीलदार रावेर यांना घेराव घातला होता .
शिवसेना (शिंदे गट )च्या रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्षा सौ नंदाताई निकम यांनी रावेर मधील गोरगरीब, वंचित, तसेच
ज्यांचेकडे केसरी व पिवळे रेशनकार्ड असूनही ज्यांना धान्य मिळत नाही .
याबाबत रावेर तहसीलदार यांचे कार्यालय गाठून तहसीलदार यांना घेराव घालून याप्रकरणी जाब विचारून निवेदन सादर करण्यात आले .
सदर प्रसंगी तहसीलदार श्री कापसे यांनी याबाबत ठोस कारवाई करून संबंधित लाभार्थ्यांना लवकरात लवकर धान्याचा लाभ देण्यात येईल .
असे आश्वासन दिले. सदर निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष सौ नंदाताई निकम यांचेसोबत शिवसेना महिला तालुका उपप्रमुख सौ भारती भारुडे, सावखेडा शहरप्रमुख सौ रुपाली महाजन, सावखेडा उपशहरप्रमुख सौ कविता नहाले, तालुका शिवसेना प्रमुख श्री वाय. व्ही. पाटील, शहरप्रमुख श्री नितीन महाजन, रावेर विधानसभा प्रमुख श्री कुणालाभाऊ बगरे, यावल तालुकाप्रमुख राजूभाऊ काठोके व फैजपूर शिवसेना प्रमुख श्री पिंटूभाऊ मंडवले आदी शिवसैनिक मंडळी उपस्थित होते.