Wednesday, March 26, 2025
Homeजळगावगोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण जखमी !

गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण जखमी !

गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण जखमी !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून फूल भांडारमध्ये काम करणारे फरदीन खान सादिक खान (२७, रा. दूध फेडरेशन परिसर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गोलाणी मार्केटमध्ये एका फूल भांडारमध्ये फरदीन खान सादिक खान हे काम करतात. सोमवारी दुपारी ते मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर असताना पाय सरकल्याने त्यांचा तोल गेला. त्यांनी आधारासाठी तेथे सुरक्षिततेसाठी लावलेल्या रेलिंगला (लोखंडी पाइप) पकडले, मात्र ते गंजून खराब झालेले असल्याने तुटले व फरदीन हे तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, हातापायालाही मार लागला आहे. परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत खान यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या