Monday, March 24, 2025
Homeगुन्हागोळीबार करून दहशत माजविणाऱ्या वाळूमाफियास अटक.

गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या वाळूमाफियास अटक.

गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या वाळूमाफियास अटक!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालाने फोटो काढले असता.तेथील एका वाळू माफियाने हवेत गोळीबार दहशत निर्माण केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेने त्या गोळीबार करणाऱ्या निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे ( कोळी ( ३२ ) रा. वाकटुकी, ता.धरणगाव ) यास अटक केली आहे.चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याने तो रोखण्यासाठी गावाबाहेर रस्त्यात ठिकठिकाणी चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला मात्र अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाकटुकी येथील काही जणांनी चाऱ्या बुजविल्या. याबाबत कोतवाल अमोल गुलाब मालचे यांस समजल्याने त्याने तत्काळ घटनास्थळी जाऊन जाब विचारला असता एका वाळू माफियास राग येऊन शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गोपाळ कोळी याने त्यांच्या जवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला.या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. आणि हवेत गोळीबार केल्यानंतर संशयीत पसार झाला होता.

जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील आठवडे बाजारातून संशयीताला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील गावठी कट्टा व मॅगझीनसह २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.संशयित आरोपीला पुढील चौकशी व तपासासाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.सदर कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे,जितेंद्र पाटील,दीपक माळी,रवींद्र पाटील आदींच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या