गोवंश कत्तल थांबेना : शिरसोलीत तणाव… तिघांवर गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गोवंशाची कत्तल करुन मांस विक्री करत असल्याच्या कारणावरुन शिरसोली बुधवारी सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणाहून गोवंशाची कत्तल केलेले १२ किलो मांस एमआयडीसी पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील फुकटपुरा भागातील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच परिसरात जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता, यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार सपोनि अनिल वाघ, उपनिरीक्षक राहुल तायडे, सफौ अधिकार पाटील, पोहेकॉ समाधान टहाकळे, शुद्धोधन ढवळे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संशयितांकडून पिशवीत विक्रीसाठी ठेवेलेले गोवंशाचे मांसासह कत्तलीचे साहित्य जप्त केले.
पोलिस कर्मचारी शुद्धोधन ढवळे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात शेख युनूस ऊर्फ कालू शेख बुर्हान (वय ६५, रा. तांबापुरा), निहाल शेख युनूस (वय २१), शेख कलीम शेख सलीम (वय ३३, रा. भिलपुरा चौक) या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.