Thursday, March 27, 2025
Homeभुसावळग्रीक रोमन मुले व मुली कुस्ती चाचणी स्पर्धा १६ सप्टेंबर रोजी होणार...

ग्रीक रोमन मुले व मुली कुस्ती चाचणी स्पर्धा १६ सप्टेंबर रोजी होणार !

ग्रीक रोमन मुले व मुली कुस्ती चाचणी स्पर्धा १६ सप्टेंबर रोजी होणार !

वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – फ्रीस्टाईल ग्रीक रोमन राज्य कुस्तिगीर संघाच्या आदेशान्वये विविध गटातील ग्रीको रोमन फ्री स्टाईल भुसावळ तालुका कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सोमवार दि .१६ सप्टेंबर रोजी वरणगांव येथिल श्री हनुमान व्यायामशाळेमधे घेतल्या जाणार आहे .

सदरील कुस्ती स्पर्धा १५ / १७ / व२० वर्षाखालील वयोगटामधे व ग्रीको रोमन कुस्ती नियमाप्रमाणे विविध वजन गटात घेण्यात येणार असुन त्यासाठी वयाच्या पुराव्याचे मेडीकल प्रमाणपत्र व पालकाचे संमतीपत्र आवश्यक असेल . या स्पर्धासाठी वजन घेणे ९ वाजेपासुन सुरु होईल . तसेच दहा वाजता प्रत्यक्ष कुस्त्यांना सुरुवात होईल . तरी भुसावळ तालुक्यातील मल्ल मुली व मुले पैलवानांनी वेळेच्या आत उपस्थित राहावे असे आवाहन भुसावळ तालुका कुस्तीगीर संघातर्फे करण्यात आले आहे.

कुस्ती स्पर्धेसाठी येतांना वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड किंवा जन्म दाखला आणणे आवश्यक आहे . वजनामधे कुठलीच तफावत चालणार नाही तंतोतंत व योग्य वजन गट असेल त्यांनाच जिल्हा कुस्तीस्पर्धेमधे भाग घेता येईल याची सर्व पैलवानांनी नोंद घ्यावी .असे आवाहन भुसावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नामदेव पहेलवान , उपाध्यक्ष सुपडु पहेलवान . प्रशांत पहेलवान , जमील पहेलवान ‘ एकनाथ पहेलवान , संजय पहेलवान ‘ बाळासाहेब चव्हाण व भुसावळ तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या