Sunday, March 16, 2025
Homeजळगावघटस्थापनेची तयारी सुरु असतांना १९ वर्षीय युवकाला विजेचा जबर धक्का लागून दुर्देवी...

घटस्थापनेची तयारी सुरु असतांना १९ वर्षीय युवकाला विजेचा जबर धक्का लागून दुर्देवी मृत्यू !

घटस्थापनेची तयारी सुरु असतांना १९ वर्षीय युवकाला विजेचा जबर धक्का लागून दुर्देवी मृत्यू !

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील गरताड येथील केतन समाधान पाटील या १९ वर्षीय युवकास घटस्थापनेची तयारी करताना विजेचा जबर धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना २ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ही माहिती मिळताच गरताड ग्रामस्थांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. चोपडा येथील फार्मसी महाविद्यालयात शिकत असलेला गरताड येथील १९ वर्षीय केतन समाधान पाटील हा २ रोजी दुर्गा देवीच्या घटस्थापनेची तयारी करत होता. या वेळी त्यास विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत केतन पाटील याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मयत घोषित केले. केतन पाटील हा समाधान मधुकर पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे गरताड गावात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या