घटस्फोट झाल्याचे भासवून लग्न करून फसवणूक, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पहिले लग्न झालेले असतानाही घटस्फोट झाल्याचे भासवून भुसावळ शहरातील एका 29 वर्षीय महिलेशी लग्न केले. लग्नानंतर झालेला मुलगा दत्तक देण्यासाठी आग्रह करून त्या महिलेचा छळ करीत दागिने हडपले असा खळबळजनक प्रकार घडला आहे.याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.
पीडितेचा 2015 मध्ये पहिला विवाह झाला. काही कारणास्तव त्यांचा 2020 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सचिन सैदाणे यांच्यामार्फत त्यांचा विवाह शरद सैंदाणे यांच्यासोबत 2022 साली झाला होता.लग्नानंतर 2023 साली पीडितेने मुलाला जन्म दिला. शरद सैंदाणे याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नसताना देखील तसे विवाहितेला तसे भासवून दुसरे लग्न केले होते.विवाहितेला झालेले मूल हे आशा सैंदाणे यांना दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला.तसेच शिवीगाळ करून मारहाण केली आणि अंगावरील दागिने देखील काढून घेतले.यानंतर विवाहितेला माहेरी सोडून देत तिची फसवणूक केली म्हणून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे, आशा हर्षल सैंदाणे सर्व (रा. नांदेड, ता. धरणगाव), सुनील सोनवणे, रेखा सुनील सोनवणे, मयूर सुनील सोनवणे (सर्व रा. जामनेर), सचिन सैंदाणे (रा. नांदेड, ता. धरणगाव, ह. मु. पुणे) यांनी छळ केल्याचे पिडीत महिलेने म्हटले आहे.यातील मुख्य आरोपी हा गोंदिया येथील पोलीस उपनिरीक्षक आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय तायडे तपास करीत आहेत.