घरफोडीतील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील शिवाजी चौकात घरफोडी करणाऱ्या प्रेमसिंग रामसिंग टाक (वय ५०, रा.इनपूर, जि. खंडवा, मध्य प्रदेश) व साजनसिंग रुपसिंग टाक (वय ५०, रा. चाळीसगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्य आवळल्या. त्यांच्याकडून १ लाख ९३ हजार रुपये रोख, ५ लाख १० हजार रुपये किमतीचे ५९.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगावातील शिवाजी चौकात घरफोडी झाल्याची घटना घडली होती. घटनास्थळावर मिळून आलेले पुरावे तांत्रीक माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळून या गुन्ह्याची उकल केली. अटकेतील दोघांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा गुन्हा एलसीबीचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार सुधाकर अंभोरे, मुरलीधर धनगर, राहूल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार, प्रियंका कोळी व दीपक चौधरी यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे.