Wednesday, March 26, 2025
Homeजळगाव...घराचा दरवाजा उघडताच आईला दिसला मुलाचा मृतदेह !

…घराचा दरवाजा उघडताच आईला दिसला मुलाचा मृतदेह !

…घराचा दरवाजा उघडताच आईला दिसला मुलाचा मृतदेह !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महिनाभराची सुट्टी घेऊन आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आईला मिसळ आणण्यास सांगितले. आई मुलासाठी मिसळ घेऊन आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच समोर गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचा मृतदेह दिसला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ८:३० वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडली. दीपक अशोक निकम (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आई मिसळ घ्यायला गेल्यानंतर घरी कोणीही नव्हते. तेव्हा मधल्या घरात जाऊन दीपकने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर आई मिसळ घेऊन घरी परतली असता दरवाजा लावलेला दिसला. दरवाजा उघडताच समोर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. आईने हंबरडा फोडल्यानंतर शेजारी व दीपकचे नातेवाईक घरात आले, त्यांनी लागलीच दीपकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दीपकला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात दीपकच्या नातेवाइकांनी, मित्रांनी गर्दी केली होती. घटनेप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दीपकच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. दीपकच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या