Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाचाकूचा धाक दाखवून अज्ञात दोन युवकांनी तरुणाला लुटले !

चाकूचा धाक दाखवून अज्ञात दोन युवकांनी तरुणाला लुटले !

चाकूचा धाक दाखवून अज्ञात दोन युवकांनी तरुणाला लुटले !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असलेले योगेश पाटील (वय २९) या युवकाला बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा रोडवरील नगावफाट्याजवळ अज्ञात दोन युवकांनी नाकावर जोराचा बुक्का मारुन व चाकूचा धाक दाखवून २ हजार रुपये व मोबाईल लुटल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, योगेश पाटील हे पारोळा येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. ते रोज पातोंडा ते पारोळा दुचाकीने ये-जा करतात. नेहमीप्रमाणे ते पारोळा येथून घराकडे येत असताना अमळनेर ते चोपडा रोडवरील नगाव फाट्यापासून काही अंतरावर ७ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे पल्सर या दुचाकीने योगेश पाटील यांच्या गाडीसमोर उभे ठाकले. गाडी थांबताच त्यांनी योगेश यांच्या नाकावर जोराचा बुक्का मारताच ते बेशुद्ध झाले. त्यांना काही कळेनासे झाल्यावर चोरट्यांनी त्यांना गाडीवरून ओढत नेत शेजारील मक्याच्या शेतात नेले. तेथे पाठीमागे चाकू लावून त्याचे तोंड मातीत खुपसून खिशातील पाकीट व मोबाईल काढून तसेच शर्ट फाडून व गाडीची चावी फेकून चोरट्यांनी तेथून पळ काढला. योगेश पाटील यांनी स्वतःला सावरत मुख्य रस्त्यावर येऊन वाहनांना हात दिला.

मात्र, कोणतेच वाहन त्यांना मदत करण्यासाठी थांबले नाहीत. त्याच मार्गावरून जाणाऱ्या नांद्री येथील मोसीन या युवकाने योगेश पाटील यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. तसेच सोनखेडी येथील पोलीस पाटलांनी लागलीच अमळनेर पोलीस ठाण्यात घटनेची वार्ता कळवली. अमळनेर पोलिसांनी लागलीच घटनास्थळ दाखल होत माहिती घेतली. कुटुंबीयांनी घरी आल्यानंतर योगेशवर उपचार केलेत. या घटनेची अमळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या