Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाचाकूच्या धाकावर खंडणी मागणारा अटकेत

चाकूच्या धाकावर खंडणी मागणारा अटकेत

चाकूच्या धाकावर खंडणी मागणारा अटकेत

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दुचाकीवरून मुलांना इकरा कॉलेज येथे घेऊन जात असलेल्या शेख अकबर शेख अब्बास (वय ३३, रा. अक्सा नगर) यांना चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या अजिज बाबा मुलतानी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मुलतानी याने शुक्रवारी शेख अकबर यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत दोन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार अक्सा नगरात घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही एक कारण नसताना अजिज याने चाकू भिरकावून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक संजय पाटील यांनी मुलतानी याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या