चार वर्षांनंतर जामीनावर कारागृहातून बाहेर येताच तरुणावर प्राणघातक हल्ला
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – खुनाच्या आरोपातील तरूण हा चार वर्षांनी आज जामीनावर कारागृहातून बाहेर येताच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवार रोजी जळगावात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना काळातील सन 2020 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची आज जामिनावर सुटका झाल्यानंतर तापून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी धारदार शास्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.प्रतीक हरिदास निंबाळकर (वय 29 राहणार जुना कानळदा रोड सिटी कॉलनी जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सन 2020 मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात प्रतीक निंबाळकर हा गेल्या चार वर्षांपासून कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. दरम्यान, न्यायालयाच्या अटी शर्तीवर प्रतीक निंबाळकर याचा आज जामीन मंजूर करण्यात आला होता.सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रतीक निंबाळकर हा त्याचा भाऊ वैभव निंबाळकर यांच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता.
दरम्यान शाहूनगर येथील धरम हॉटेल जवळून जात असताना यावेळी टपून बसलेले तीन हल्लेखोरांनी अचानक प्रतिकवर धारदार शास्त्राने वार करून डोक्यावर गंभीर दुखापत केली आहे.घटनेनंतर नागरीकांच्या सहकार्या ने त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. या संदर्भात पोलिसात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.