Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाचार हजाराची लाच घेताना वीज वितरणच्या महिला अधिकाऱ्यांसह दोन जणांना अटक

चार हजाराची लाच घेताना वीज वितरणच्या महिला अधिकाऱ्यांसह दोन जणांना अटक

चार हजाराची लाच घेताना वीज वितरणच्या महिला अधिकाऱ्यांसह दोन जणांना अटक

फैजपूर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

हॉटेल चालकावर जुन्या वीज मीटर मध्ये फॉल्ट केल्याचा ठपका ठेवत नवीन वीज मीटर बसवून जुन्या मीटरचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी तडजोडी अंती चार हजाराची लाच स्वीकारताच वीज वितरण कंपनीच्या सावदा विभागातील पाडळसा कक्ष महिला अधिकाऱ्यासह लाईनमन व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना जळगाव एसीबीने आज गुरुवारी दुपारी दोन वाजतां अटक केली.
हॉटेल चालकावर जुन्या वीज मीटर मध्ये फॉल्ट केल्याचा ठपका ठेवत नवीन वीज मीटर बसवून जुन्या विज मीटरचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी सुरुवातीला वीस हजार व नंतर पंधरा हजार रुपये लाच मागत चार हजाराची लाच तडजोडी अंती स्वीकारणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सावदा विभागातील पाडळसा कक्ष सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे (४२, हुडको कॉलनी, भुसावळ) लाईनमन संतोष सुकदेव इंगळे (४५, मल्हार कॉलनी, फैजपूर ) व वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी ( ३९, अयोध्या नगर, भुसावळ ) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. भुसावळ तालुक्यातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत.त्यांच्या हॉटेल वर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावून तक्रारदार यांनी जुन्या मिटर मध्ये फॉल्ट केला आहे असे भासवून तक्रारदार यांच्यावरती सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात तिन्ही कर्मचाऱ्यांनी

 

सुरुवातिला वीस हजार व नंतर पंधरा हजार रुपये लाच बुधवारी दि. १८ रोजी मागितली होती. चार हजार रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर एसीबी कडे तक्रार नोंदवण्यात आली. यातील संतोष इंगळे ने आज गुरुवारी दुपारी दोन वाजतां लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर अन्य दोघांनांही अटक करण्यात येवून त्यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. या लाच प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या