Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाचाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणारा अटकेत!

चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणारा अटकेत!

चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणारा अटकेत!

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या गुढे येथील संशयिताला आरपीएफने सोमवारी रात्री ११:१५ वाजता ताब्यात घेतले आहे. विकास एकनाथ पाटील याने हा फोन केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दि. ९ रोजी सुमारे ९:१५ वाजता, पोलिस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला ही माहिती लगेच कळविण्यात आली. आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर शोधाशोध केली. आरपीएफ डॉग स्क्वॉडने तपासणी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या गुढे येथील संशयिताला आरपीएफने सोमवारी रात्री ११:१५ वाजता ताब्यात घेतले आहे. विकास एकनाथ पाटील याने हा फोन केल्याची कबुली दिली आहे.दि. ९ रोजी सुमारे ९:१५ वाजता, पोलिस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला ही माहिती लगेच कळविण्यात आली. आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर शोधाशोध केली. आरपीएफ डॉग स्क्वॉडने तपासणी केली. १ ते ४ पर्यंतचे सर्व प्लॅटफॉर्म तपासण्यात आले आणि तेथे बॉम्ब किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्याची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.
जळगाव येथील पोलिस पथक आणि आरपीएफ डॉग स्क्वॉड, मनमाड यांनी त्वरित कारवाई केली आणि ११:२० वाजता संशयिताला पकडण्यात आले. मानसिक अस्वस्थ वाटत असलेल्या आरोपी विकास एकनाथ पाटील याने खोटा बॉम्ब कॉल केल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मध्य रेल्वे आरपीएफ आणि शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि जलद तपास कौशल्य दाखवून २ तासांच्या कालावधीत या प्रकरणाची उकल केली आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या