चेक अनादर प्रकरणी वरणगावच्या हॉटेल व्यवसायिकास ४१ लाख रुपये भरण्याचे न्यायालयाचे आदेश !
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव येथील हॉटेल व्यवसायिक यांनी मध्य प्रदेशातील केला गृप व्यवसायिक व्यक्तीकडून उधार घेतलेल्या पैश्या बद्दल चेक पाठविला होता. पण चेक बाउंस झाल्या प्रकरणी फिर्यादीस रक्कम परत करण्याचे आदेश बुरहानपूर न्यायालयाने दिला असल्याची माहिती फिर्यादी गजानन महाजन यांनी हतनूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, वरणगाव येथील पेट्रोल पंपा समोर राहणारे संजय नारायण देशमुख यांनी गजानन महाजन रा . लोणी , ता . बुरहानपूर यांच्याकडून तीस लाख रुपये उधार घेतले होते सदर पैसे परत करण्यासाठी त्यांनी मला स्टेट बँकेचा चेक दिला होता. परंतु सदर स्टेट बँकेत टाकला असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याने हा चेक बाउन्स झाला. याबाबतचे कागदपत्र बॅकेकडून घेऊन गजानन महाजन यांच्या तर्फे बुरहानपूर कोर्टात दावा कलम १३८ प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला होता.या दाव्याचा बुरहानपूर न्यायालयात निकाल लागला असून या निकालात संजय देशमुख यांनी 41 लाख चौऱ्याहत्तर हजार चारसे साठ रुपये फिर्यादी गजानन महाजन यांना परत करण्याचे व सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. देशमुख यांनी याबाबत अपिल केल्या नंतर कोर्टाने निकाल कायम ठेवला आहे मला अद्यापही पैसे मिळाले नाही व इतरांनी सावध व्हावे यासाठी मी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे असे गजानन महाजन यांनी सांगितले.
दरम्यान संजय देशमुख यांची भेट घेतली असता ते म्हणाले मी प्रत्यक्षात घेतलेली रकम हि १९ लक्ष असुन त्यापैकी सहा लाख व व्याज संबंधितांना परत केले असुन फक्त १३ लाख रु.देणे बाकी आहे व मी ते देण्यास तयार असुन सुद्धा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला फसविले जात आहे. त्यासाठी मी कायदेशीर लढा देत आहे