चोरट्यांना रंगेहाथ पकडले : नागरिकांनी दिला प्रसाद !
जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पहूर येथे घर बांधकामाची अडीच लाखांची रोकड लांबविताना नागरिकांनी रंगेहाथ पकडून चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता महामार्गावर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नीलेश बोदडे यांनी महामार्गालगतचे दुकान बंद केले आणि घराच्या बांधकामासाठी काढलेली रोख रक्कम मित्र रतन क्षीरसागर यांच्याकडे दिली. त्याचवेळी नदीम अयुब शहा, (वय २६), रा. खाजानगर, पहूर याने पैशांची पिशवी हिसकावली आणि तो एका ट्रकमध्ये जाऊन लपला. त्यानंतर नीलेश आणि रतन यांनी त्याला ताब्यात घेतले. संतप्त नागरिकांनी चोप दिला. नीलेश बोदडे यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती