चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोकड लांबविली !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घरात सर्व जण झोपलेले असतांना किचनच्या दरवाजाची आतील कडी ओढून दरवाजा उघडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले २३ हजार ३०० रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. २३ रोजी पहाटे साडेतीन ते सहा वाजेच्या दरम्यान, ममता हॉस्पिटलजवळील गणेशपुरी भागात घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणेशपुरी भागातील ममता हॉस्पिटलजवळ मोहसीन खान अजमल खान (वय ३९) हा तरुण वास्तव्यास असून त्याचा बेकरीचा व्यवसाय आहे. दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सर्व कुटुंबिय झोपलेले असतांना, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने मोहसीन खान यांच्या घरातील किचननच्या दरवाजाची आतुन लावलेल कडी ओढून दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करुन चोरट्याने त्यांच्या घरात ठेवलेली २३ हजार ३०० रुपयांची रोकड चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास मोहसीन खान यांच्या कुटुंबियांना जाग आली असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहे.