चोरीचा संशय : तरुणाला जबर मारहाण
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील उसमळी येथे शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. व दगड मारून दुखापत केली. याप्रकरणी गुरुवारी यावल पोलिस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील उसमळी या गावात आकाश तोताराम बारेला वय १९ हा तरूण आपल्या घरी होता. तेव्हा तेथे रामलाल हरचंद बारेला आणि खुबसिंग शिरताब भिलाला हे दोघे आले आणि शेतातून तुरीचे पीक चोरी केल्याच्या रागातून त्याच्याशी वाद घालून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि दगड मारून दुखापत केली. तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.