Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाचोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या !

चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या !

चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील मेहुणबारे तालुक्यातील दहिवद व खडकीसिम येथून तब्बल १६ बकऱ्या चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्याने ज्याला कमी दरात बकऱ्या विक्री केल्या होत्या, त्याच्या मुसक्या आवळल्या. हुसेन समशुभाई खाटीक (हांडेवाडी फाटा मंजूर, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भाऊसाहेब युवराज पवार (दहिवद) यांच्या एकूण ५३ हजार रुपये किमतीच्या ५ बकऱ्या व प्रवीण तुळशीराम पाटील (खडकीसिम) यांच्या ८९ हजार रुपये किमतीच्या एकूण ११ बकऱ्या रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरी नेल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला संबंधित शेतकऱ्यांनी बकऱ्या चोरीच्या फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणून बकऱ्या चोरी करणारा मुख्य आरोपीचे नाव शोधून काढले.

या चोराकडून बकऱ्या विकत घेणारा संशयित हुसेन समशुभाई खाटीक (हांडेवाडी फाटा मंजूर, ता. कोपरगांव, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने कमी किमतीमध्ये बकऱ्या विकत घेतल्याची कबली दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या