छत्रपती शिवाजी महाराज हे सूक्ष्म नियोजनाचे कौशल्याचे धनी :
डॉ. नरेंद्र महाले.
यावल दि.२० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावलच्यावतीने डॉ.नरेंद्र महाले व्याख्यान,राजे निंबाळकर यांच्या किल्ल्याच्या पायथ्याशी यावल येथे आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर ,निवासी नायब तहसीलदार संतोषजी विनंते, यावल तहसीलचे गांगुर्डे साहेब, देवकांत पाटील,डॉ.अभय रावते यांची उपस्थिती होती.तसेच यावल शहरातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर भारताच्या संप्रभूतेला अधिक बळकटी मिळाली असती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताने आपला अधिकार अधिक स्वाभिमानाने विकसित राष्ट्र म्हणून बिंबवला असता हे डॉ.महाले यांनी प्रकर्षाने मांडले.त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सूक्ष्म नियोजनाने मुघलांच्या जुलमी राजवटीला कशा पद्धतीने सडोकी पडू केले याची अनेक दाखले देत,अत्यंत प्रभावी शैलीमध्ये आपले म्हणणे मांडले. आपल्या भाषणात एक भारतीय नागरिक म्हणून आपण देशासाठी काय करू शकतो,या संदर्भाने विचार करून स्वराज्यनिष्ठा व त्याचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावरून जनसामान्यांना पटवून दिले. त्याचबरोबर जलसंधारण ,शेती , जल मार्गाने होणारा व्यापार या अनुषंगाने महाराजांची दूरदृष्टी ही अत्यंत सखोल पद्धतीने स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवरांचे आभार नितीन बारी सर यांनी मांडले.कार्यक्रमाचे आयोजन एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अभय रावते व त्यांच्या प्रतिष्ठांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते.