जमावाने केली दारुड्याची धुलाई : तरुणाला केली होती मारहाण !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वारांनी तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्या दोघांनी भरत भगवतीप्रसाद ओझा (वय ३२, रा. विजयनगर, कानळदारोड) या तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी महिला पोलिस त्याठिकाणी पोहचले असता, त्यांना देखील त्या तरुणांनी अरेरावी केल्याने त्यांची नागरिकांनी धुलाई केली. ही घटना दि. २६ रोजी सकाळी दहा वाजता कानळदा रोडवर घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानळदा रोडवरील विजय नगरात भरत भगवतीप्रसाद ओझा हा तरुण वास्तव्यास असून त्याचे किराणा दुकान आहे. दि. २६ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुचाकीने दाणाबाजारात जात होते. त्यावेळी धनाजी काळे नगरकडून कानळदा रोडवर दोन दुचाकीस्वारांनी ओझा यांच्या दुचाकीला धडक देत मारहाण केली.त्या दोन महिला पोलिस कर्मचारी आल्यानंतर त्यांनी ओझा यांना त्या तरुणांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना देखील त्या नशेत असलेल्यांनी अरेरावी केली जात असल्याने परिसरातील नागरिकांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. यावेळी तन्वीर उर्फ तन्या शेख रहीम शेख रा. गेंदालाल मिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे