Monday, March 24, 2025
Homeजळगावजळगांव येथील भाजपा संघटन पर्व अभियान “विभागीय कार्यशाळेत केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई...

जळगांव येथील भाजपा संघटन पर्व अभियान “विभागीय कार्यशाळेत केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती.

जळगांव येथील भाजपा
संघटन पर्व अभियान “विभागीय कार्यशाळेत केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती.

जळगाव दि.१५  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगांव येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महारातील जळगांव – धुळे – नंदुरबार जिल्ह्याची “ विभागीय कार्यशाळा” आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांचेकडून “भाजपा सदस्यता अभियान” बाबत आढावा घेण्यात येऊन, उत्तर महाराष्ट्रातील पक्षाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. आदरणीय श्री.नरेंद्र मोदीजीं च्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी राज्यात १ कोटी नागरिकांनी भाजपा पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.आगामी काळात दीड कोटी सदस्यसंख्या असलेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष्य पार करण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण, मंत्री मा.श्री.गिरीषजी महाजन, मंत्री मा.जयकुमारजी रावल, आमदार विक्रांतजी पाटील, राजेशजी पांडे,प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी,खासदार श्रीमती स्मिता वाघ,आमदार विजयकुमार गावित,माजी खासदार डॉ.सुभाषजी भामरे,आमदार सुरेशजी भोळे,आमदार मंगेशजी चव्हाण,आमदार राजेशजी पाडवी, आमदार अमोलजी जावळे, आमदार अनुपजी अग्रवाल,रविजी अनासपुरे, किशोरजी काळकर यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या