वाळू तस्करांची मुजोरी वाढली ! तहसीलदारांच्या वाहनाला चक्क वाळू माफियांच्या ट्रॅक्टरची धडक
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वाळू चोरी रोखण्यासाठी तलाठी व कर्मचारी गस्त घालत असतांना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली आहे . सदर घटना जळगांव येथील बिबा नगर परिसरात घडली आहे.यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.
मात्र या घटनेत वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन शासकीय कारवाई मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असल्याने खळबळ उडाली आहे. अखेर हे वाहन जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयात जमा करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .गुरुवारी आज सकाळच्या सुमारास ४ ते ५ तलाठी यांनी बिबा नगर या ठिकाणी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले.हे वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांनी तहसीलदार यांचे वाहन बोलाविले होते. तहसीलदार यांचे वाहन आल्यावर या ठिकाणाहून वाळूचे ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत होते. तेव्हा ट्रॅक्टर चालक हे वाहन पळवून घेऊन जात असतांना ट्रॅक्टरने चक्क तहसीलदार यांच्या वाहनालाच जोरदार धडक दिली.सुदैवाने हि गाडी उलटी होता होता वाचली.
या धडकेत कुणीही जखमी झाले नाही. हे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे . यावर काय कारवाई होणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे यावरून वाळू तस्कर यांची मुजोरी समोर आली आहे .