वाहनात गॅस भरतांना स्फोट प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता. याचे पडसाद उमटले असुन एम आय डीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दतात्रेय निकम यांची याच कारणाने बदली झाली आहे .
या घटनेबाबत जळगाव येथे जोरदार टिका सुरू असल्याने कार्यवाही चा भाग एमआयडीसी म्हणून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.त्यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. असे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात केवळ सहा महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक म्हणून दत्तात्रय निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यानंतर गेल्या महिन्यात इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ११ जण भाजले गेले होते. यातील सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पूर्ण जळगाव जिल्ह्यात याबाबत पडसाद उमटले व सर्वत्र चर्चा सुरू होती.त्यामुळे निकम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.घटना घडली त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती. आचारसंहिता संपताच बदली विषयी हालचाली गतिमान झाल्या. अखेर शनिवारी ७ डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. येथील पदभार दुय्यम अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.